Chips Packet | सावधानः चिप्सच्या पाकिटावर 'Expiry Date' पाहिली का?

Namdev Gharal

चिप्सचे पाकीट उघडण्यापूर्वी आपण अनेकदा घाई करतो, पण एक छोटी चूक आरोग्यासाठी घातक ठरु शकते, यासाठी चिप्सच्या पाकिटावरली एक्स्पायरी डेट किंवा बेस्ट बिफोर तपासा.

पाकिटावर 'Best Before' लिहिले असेल तर त्याचा अर्थ त्या तारखेपर्यंत चिप्सची चव आणि गुणवत्ता सर्वोत्तम असेल. ती उलटल्यावर चव बिघडू शकते.

चिप्स तळण्यासाठी तेल वापरले जाते. मुदत संपल्यावर या तेलाचे ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे चिप्सला एक प्रकारचा जुनाट किंवा खवट वास येतो.

एक्स्पायर्ड चिप्स खाल्ल्याने पोटदुखी, मळमळ किंवा जुलाब होण्याचा धोका असतो. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत जास्त काळजी घ्यावी.

जर चिप्सचे पाकीट पिचलेले असेल किंवा त्यातील हवा (नायट्रोजन गॅस) निघून गेली असेल, तर समजून जा की चिप्स मऊ पडले आहेत आणि ते खाण्यायोग्य नाहीत.

जुन्या तेलात तळलेले चिप्स खाल्ल्याने ॲसिडिटी वाढू शकते. यामुळे घसा खवखवणे किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो.

जर पाकिटात चुकून ओलावा शिरला असेल, तर मुदत संपल्यानंतर त्यावर सूक्ष्म बुरशी तयार होऊ शकते, जी डोळ्यांना चटकन दिसत नाही पण विषारी असू शकते.

मुदत संपल्यावर चिप्समधील मसाला आणि कुरकुरीतपणा पूर्णपणे निघून जातो. अशा वेळी ते खाण्यात काहीच अर्थ उरत नाही.

नेहमी पाकिटाच्या मागच्या बाजूला असलेली तारीख तपासा. 'डिस्काउंट'च्या नादात एक्स्पायरी जवळ आलेली पाकिटे घेणे टाळा.