मोबाईल शिवाय मुलं जेवत नाहीत.. मग हे नक्की करा..

पुढारी वृत्तसेवा

स्क्रीनशिवाय जेवण्याची सवय लावा

मोबाइल किंवा टीव्ही दाखवून जेवण भरवण्याऐवजी हळूहळू स्क्रीन बंद करून जेवण्याची सवय लावा.

पालकांनी संयम ठेवणे गरजेचे

मुलाची स्क्रीनची सवय एका दिवसात सुटत नाही. त्यामुळे पालकांनी राग न करता संयमाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

कलरिंग आणि क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज द्या

कलरिंग, क्ले, स्लाइम आणि इतर क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये मुलांना गुंतवा. यामुळे त्यांचे मनोरंजनही होईल, स्क्रीनपासून लक्षही दूर राहील.

जेवताना मुलांना गोष्टी सांगा

मोबाइलऐवजी जेवताना मुलांशी गप्पा मारा किंवा मजेदार गोष्टी सांगा. यामुळे मुलांचे लक्ष स्क्रीनऐवजी जेवणाकडे राहण्यास मदत होते.

जेवणाची प्लेट आकर्षक बनवा

डाळ, भात, पोळी, भाजीसोबत सलाड किंवा रंगीत पदार्थ प्लेटमध्ये ठेवा. विविध पदार्थ पाहून मुलांना स्वतःहून जेवण्याची उत्सुकता निर्माण होऊ शकते.

आउटडोअर ॲक्टिव्हिटीज वाढवा

स्विमिंग, बॉल खेळणे, सायकलिंग किंवा पार्कमध्ये खेळणे अशा बाहेरील उपक्रमांमध्ये मुलांना सहभागी करा.

ब्रेन गेम्सची मदत घ्या

ब्लॉक्स, अल्फाबेट्स, नंबर्स आणि पझल्ससारखे मेंदूला चालना देणारे गेम्स मुलांना द्या. सुरुवातीला पालकांनी मुलांसोबत खेळल्यास त्यांना अधिक रस वाटतो.

स्क्रीन टाइमसाठी ठरावीक वेळ ठेवा

दिवसभर मोबाइल देण्याऐवजी स्क्रीन पाहण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करा. हळूहळू स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा.

पालकांनीही स्वतःचे स्क्रीन वापरणे कमी करावे

मुलांसमोर सतत मोबाइल वापरत असाल तर मुलांनाही त्याची इच्छा होते. त्यामुळे पालकांनीही गरज असेल तेव्हाच मोबाइल वापरून मुलांसमोर चांगले उदाहरण ठेवावे.