शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे अंदमान-निकोबार बेट भारतात?

पुढारी वृत्तसेवा

अंदमान-निकोबार भारतात कसे राहिले?

आरमार प्रमुख कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमाशी जोडली जाते एक ऐतिहासिक कथा.

Andaman and Nicobar | Pudhari

अंदमानचा पहिला उल्लेख कुठे?

अंदमान बेटांचा उल्लेख प्राचीन चिनी साहित्यात आढळतो. भारताकडे येणाऱ्या एका चिनी व्यापाऱ्याचे जहाज भरकटून या बेटांवर पोहोचल्याची नोंद आहे.

Andaman and Nicobar | Pudhari

'येनटोमेन' ते अंदमान

चिनी प्रवाशांनी या बेटांचा उल्लेख 'येनटोमेन' असा केला होता. पुढे काळाच्या ओघात हेच नाव बदलत जाऊन 'अंदमान' झाले.

Andaman and Nicobar | Pudhari

चोल राजांनीही केला होता वापर

इतिहासकारांच्या मते, दहाव्या शतकात चोल राजा राजेंद्र चोलाने सुमात्रा मोहिमेसाठी या बेटांचा वापर केला होता.

Andaman and Nicobar | Pudhari

भारतात नौदलाची कमतरता

मध्ययुगीन काळात भारतात अनेक सामर्थ्यवान राजे होते. पण बहुतांश राज्यांकडे मजबूत आरमार नव्हते.

Andaman and Nicobar | Pudhari

शिवाजी महाराजांची दूरदृष्टी

समुद्रमार्गे होणारा परकीय धोका ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली.

Andaman and Nicobar | Pudhari

मराठी आरमाराची धुरा कान्होजींकडे

शिवरायांनंतर मराठी नौदलाचे नेतृत्व आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या हाती आले. त्यांनी आरमाराला अभूतपूर्व बळ दिले.

Andaman and Nicobar | Pudhari

समुद्रावर मराठ्यांची सत्ता

मुंबईपासून वेंगुर्ल्यापर्यंतचा किनारा, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातही कान्होजी आंग्रेंचा प्रभाव होता.

Andaman and Nicobar | Pudhari

इंग्रजांनाही पडला होता प्रश्न

कान्होजी आंग्रेंच्या धाडसी मोहिमांमुळे इंग्रज त्रस्त झाले होते. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा याची चिंता लंडनपर्यंत पोहोचली होती.

Andaman and Nicobar | Pudhari

इतिहास आणि दाव्यांची पडताळणी महत्त्वाची

अंदमान-निकोबार बेटांबाबत कान्होजी आंग्रेंशी संबंधित अनेक लोकप्रिय कथा सांगितल्या जातात. मात्र इतिहासकारांच्या मते, अशा दाव्यांची पडताळणी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे करणे आवश्यक आहे.

Andaman and Nicobar | Pudhari

संदर्भ

लेफ्टनंट जनरल जे. एस. बाजवा यांचे 'इंडियन डिफेन्स रिव्ह्यू' हे पुस्तक

Andaman and Nicobar | Pudhari

उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

Eggs | Pudhari
येथे क्लिक करा