छातीत थोडे जरी दुखले तरी अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याची भीती वाटते. पण छाती दुखण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात..हृदयाचे आरोग्य बिघडल्यामुळे होणाऱ्या वेदनांना वैद्यकीय भाषेत 'एन्झाईना' म्हणतात. ही वेदना काही मिनिटांपर्यंत राहू शकते..हृदयविकाराचा झटका, कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हार्ट टिश्यूजवर सूज आल्यास छातीत तीव्र वेदना जाणवतात..जर तुमचा मधुमेह नियंत्रणात नसेल किंवा शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले असेल, तर छातीत कळा येऊ शकतात..हाय ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. याचा थेट परिणाम हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर होतो आणि छाती दुखू लागते..पोटात गॅस वाढल्यास किंवा 'गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज' मुळेही छातीत वरच्या भागात वेदना होतात..फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या होणे किंवा श्वसनक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास श्वास घेताना छातीत दुखते..अति भीती वाटल्यास हृदयाचे ठोके वाढतात. या मानसिक तणावामुळेही अनेकदा छातीत वेदना सुरू होतात..जीममध्ये जड वजन उचलताना झालेल्या चुकीमुळे स्नायूंवर ताण येतो. हे दुखणे हृदयाशी संबंधित नसते, पण वेदनादायी असते..वेदना कोणत्याही कारणाने असो, जर ती दीर्घकाळ जाणवत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.