Charles Darwin : ज्यामुळे चार्ल्स डार्वीनला उत्‍क्रांतीवादाचा विचार सुचला असे अनोखे जीव पाहून आश्चर्यचकीत व्हाल!

Namdev Gharal

उत्‍क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्वीन यांचा जन्मदिन १२ फेब्रुवारी. डार्वीन यांनी अनेक जीवांचा अभ्यास केला त्‍यावरुन त्‍याला हा विचार सुचला असे काही जीव पाहू, यातील अनेक नामषेश झाले आहेत

डार्विनचे फिंचेस (Darwin's Finches) गॅलापागोस बेटांवरील चिमणीसारख्या दिसणाऱ्या या पक्षांच्या १३-१४ प्रजातींचा त्याने अभ्यास केला. त्यांच्या चोचींमधील फरक पाहूनच त्याला 'उत्क्रांतीवादाचा' विचार सुचला.

राक्षसी कासव (Giant Tortoises): गॅलापागोस बेटांवरील ( इव्केडोर देशाजवळील पॅसिपीक समुद्रातील बेट ) वेगवेगळ्या आकाराच्या कवचांच्या कासवांचा त्याने अभ्यास केला

बार्नेकल्स (Barnacles): डार्विनने तब्बल ८ वर्षे फक्त 'बार्नॅकल्स' (समुद्री कठीण कवच असलेले जीव) या जीवावर संशोधन केले आणि त्यांच्या अनेक नवीन प्रजाती शोधल्या.

मेगाथेरियम (Megatherium): हा हत्तीच्या आकाराचा जमिनीवर राहणारा 'आळशी प्राणी' (Sloth) होता, जो आता अस्तित्वात नाही.

ग्लायप्टोडॉन (Glyptodon): हा एखाद्या कारच्या आकाराचा 'आर्मडिलो' (Armadillo) सारखा दिसणारा प्राणी होता.

टोक्सोडॉन (Toxodon): गेंड्यासारखा दिसणारा हा प्राणी देखील नामशेष झालेला होता.

फॉकलंड आयलंड लांडगा (Warrah): १८३३ मध्ये डार्विन जेव्हा फॉकलंड बेटावर गेला, तेव्हा त्याने हे लांडगे पाहिले होते. दुर्दैवाने १८७६ पर्यंत हे लांडगे पूर्णपणे नामशेष झाले.

पिंटा आयलंड कासव (Pinta Island Tortoise): डार्विनने ज्या गॅलापागोस कासवांचा अभ्यास केला, त्‍यातील ही प्रजाती नामशेष झाली आहे.