पुरण पोळी, बेसनाचे लाडू, चविष्ट पिठलं अनेकांचा आवडतं. या अर्थाने बहुतेकांना चणा डाळ अर्थात हरभरा डाळ आवडते..चणाडाळ म्हणजे जीवनसत्त्वं आणि खनिजं यांचा चांगला स्रोत आहे..या डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, बी व्हिटॅमिन, झिंक, सेलेनियम, मँगनीज आणि तांबंदेखील असतं. .इतर सर्व डाळींपेक्षा चणाडाळीत जास्त प्रथिनं आढळतात. ही डाळ फायबर म्हणजे तंतुमय घटकांनीही समृद्ध आहे..या डाळीत चांगली आणि उपयुक्त अॅमिनो अॅसिडस् देखील असतात. यामुळे हरभरा डाळ आहारात महत्वाची आहे. .ज्या लोकांना जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याची समस्या आहे. त्यांच्या जेवणात चण्याची डाळ असली तर या समस्येवर नियंत्रण राहू शकतं. .उच्च रक्तदाब आणि त्यामुळे किडनीवर होऊ शकणारा परिणाम रोखायचा असेल तर आहारात कोणत्याही स्वरूपात चण्याच्या डाळीचा समावेश केलेला चांगला..चणाडाळ हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. हाडं मजबूत करण्यास, शरीराला ऊर्जा देण्यास, रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी चणाडाळ आवश्यक आहे. .अशक्तपणा दूर करण्यात चणाडाळीचं सेवन साहाय्यकारी ठरतं.