CCTV camera history | रॉकेट लाँचिंग आणि महायुद्ध... असा लागला CCTV चा शोध!

पुढारी वृत्तसेवा

१९४२ मधील शोध

जगातील पहिल्या सीसीटीव्ही (CCTV) प्रणालीचा उगम १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला.

जर्मनीतील लष्करी तळ

या तंत्रज्ञानाचा पहिला वापर जर्मनीतील 'पीनेमुंडे' (Peenemunde) या लष्करी तळावर करण्यात आला होता.

श्रेय कोणाचे?

प्रसिद्ध जर्मन अभियंता वॉल्टर बर्च (Walter Bruch) यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक प्रकल्प साकारला गेला.

रॉकेट चाचणीसाठी गरज

त्याकाळी जर्मनी 'V-2' या जगातील पहिल्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत होता.

जीवाचा धोका टाळण्यासाठी

रॉकेट लाँचिंग दरम्यान स्फोटाचा मोठा धोका असायचा, त्यामुळे शास्त्रज्ञांना सुरक्षित अंतरावरून देखरेख करण्याची गरज भासली.

मजबूत सुरक्षा कवच

वॉल्टर बर्च यांनी हे कॅमेरे लाँच पॅडजवळ स्टील आणि काँक्रिटच्या मजबूत कवचात (Casing) सुरक्षितपणे बसवले होते.

बंकरमधून थेट प्रक्षेपण

हे कॅमेरे केबलद्वारे लांब अंतरावर असलेल्या सुरक्षित बंकरमधील मॉनिटरला जोडले गेले होते.

'क्लोज्ड सर्किट'चा जन्म

ही यंत्रणा एका बंद नेटवर्कवर (Closed Network) काम करत असल्याने याला 'Closed Circuit Television' म्हणजेच CCTV हे नाव पडले.

विश्लेषणासाठी मदत

या शोधामुळे शास्त्रज्ञांना स्वतःचा जीव धोक्यात न घालता रॉकेट प्रक्षेपणाचे बारकाईने विश्लेषण करणे शक्य झाले.

आजचे स्वरूप

युद्धाच्या गरजेतून निर्माण झालेला हा 'तिसरा डोळा' आज सार्वजनिक आणि खासगी सुरक्षेचा अविभाज्य भाग बनला आहे.