Cat Facts : ७०% वेळ झोपेत घालवतात? मांजरांच्या लाइफस्टाईलचे ८ जबरदस्त फॅक्ट्स

पुढारी वृत्तसेवा

मांजरींचे जग त्यांच्यातील गूढता आणि खास वैशिष्ट्यांमुळे नेहमीच मानवाला आकर्षित करत आले आहे. या चपळ, सुंदर आणि कधीकधी रहस्यमय प्राण्यांबद्दलची आठ मनोरंजक तथ्ये वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मांजरांच्या मिशा अत्यंत संवेदनशील असतात. त्या हवेच्या प्रवाहातील बारीक बदलही ओळखण्यासाठी त्यांना मदत करतात. यामुळेच मांजरी उत्कृष्ट मार्गदर्शक आणि शिकारी बनतात.

मांजरी त्यांच्या शरीराच्या लांबीच्या ६ पटींपर्यंत उंच उडी मारू शकतात. त्यांचे शक्तिशाली मागील पाय आणि लवचिक पाठीचा कणा त्यांना एका झटक्यात इतकी जबरदस्त उंची गाठण्यास मदत करतो.

मांजरी त्यांच्या भावना आणि गरजा व्यक्त करण्यासाठी १०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे आवाज वापरतात. यात 'म्याऊ', 'घर्र घर्र' आणि 'फुत्कार' यांचा समावेश आहे.

माणसांना वाटेल की मांजरी खूप चपळ असल्‍याने आळशी नसतील; पण वस्तुस्थिती याउलट आहे. मांजरी त्यांच्या जीवनातील सुमारे ७०% वेळ फक्त झोपण्यात घालवतात!

मांजरांचे डोळे अधिक प्रकाश आत घेण्याची क्षमता आहे. त्‍यामुळे त्यांना जवळजवळ पूर्ण अंधारातही स्पष्टपणे पाहता येते.

मांजरी स्वभावतःच जिज्ञासू (Curious) असतात. त्या नेहमी आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू, नवीन दृश्ये, वास आणि आवाज यांचा शोध घेत फिरताना दिसतात.

मांजर खूप स्वच्छ प्राणी आहे. स्वतःला स्‍वच्‍छ करण्यासाठी तासन्तास घालवतात. त्यांच्या खरखरीत जिभेचा उपयोग ते सैल झालेले केस आणि त्‍वचेवरील धूळ साफ काढण्यासाठी करतात.

मांजरी त्यांच्या पायाच्या बोटांवर (Toes) चालतात. त्यांच्या चालण्याच्या या पद्धतीमुळे त्यांची चाल अत्यंत चपळअसते, ज्यामुळे त्यांना शिकार करणे सोपे जाते.

येथे क्‍लिक करा.