Cassowary जगातील सर्वात धोकादायक पक्षी, नखे म्हणजे खंजिर! : याच्या वाट्याला ना अजगर जाते ना मगर

Namdev Gharal

पृथ्वीवर काही पक्षी अतिशय खतरनाक असतात, यामध्ये ऑफिशियली धोकादायक ठरवलेला एक पक्षी म्हणजे 'कॅसोवरी’

त्याच्या खंजीरासारख्या नखांमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे, त्याला "जगातील सर्वात धोकादायक पक्षी" मानले जाते

हा पक्षी, प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीच्या वर्षावनांमध्ये आढळतो व तो हवेत न उडणाऱ्या पक्ष्यांच्या गटात मोडतो.

याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी डायनासोरच्या काळापासून पृथ्वीवर वावरत आहे यामध्ये कोणताही बदल झालेला नाही

हा पक्षी माणसे व कुत्र्यांवर हल्ला करण्यासाठीच ओळखला जातो, शहामृग आणि इमू यांच्यानंतर हा जगातील तिसरा सर्वात मोठा आणि दुसरा सर्वात जड पक्षी आहे

वजनाने व उंचीनेही हा पक्षी महाकाय आहे यांची उंची ६ फूट असेत तर वजन ७५ किलो असते

या पक्ष्याचे सर्वात धोकादायक हत्‍यार म्हणजे त्यांच्या पायांना ५ इंच (सुमारे १२ सेमी) लांबीची खंजीरासारखी नखे असतात.

त्यांच्या किक इतक्या वेगवान आणि शक्तिशाली असतात की त्या सहजपणे हाडे मोडू शकतात आणि माणसांसाठी किंवा प्राण्यांसाठी प्राणघातक ठरू शकतात.

क्रोकाडाईल , पायथॉन, यासारखे जंगलातील धोकादायक प्राणीसुद्धा याच्या नादाला लागत नाही

हा ताशी ५० किलोमिटर वेगाने धावू शकतो, तसेच हा एका जागेवर ७ फूटांपर्यंत उंच उडी मारु शकतो. रेनफॉरेस्टमधील सर्वात धोकादायक पक्षी ठरतो

त्यांच्या डोक्यावर केराटिन पासून बनलेली एक कठीण, हाडासारखी रचना असते, जिला 'कॅस्क' म्हणतात. यामुळे दाट जंगलातून धावताना डोक्याचे संरक्षण होते