Namdev Gharal
व्रत वैकल्य, उपवास यामुळे भारतात साबुदाणा नेहमी खाल्ला जातो. हा साबुदाणा कसा तयार करतात व व याचे झाड कसे असते या विषयी जाणून घेऊया
साबुदाणा ज्या झाडापासून होतो त्याल कॅसाव्हा Cassava म्हणतात. कॅसाव्हाला भारतात 'कप्पा' (Kappa) किंवा 'मराचिनी' या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात याला साधारणपणे 'टॅपिओका' किंवा 'कसावा' म्हटले जाते.
Cassava हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील पीक असून आज आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील कोट्यवधी लोकांचे ते प्रमुख अन्न बनले आहे.
भारतात तामिळनाडूील सलेम हे भारताची "साबुदाणा राजधानी" मानले जाते. भारतातील एकूण साबुदाणा उत्पादनापैकी ६०% ते ७०% साबुदाणा एकट्या सलेम आणि आसपासच्या भागात तयार होतो
कॅसावा झाडाला जमीनीत रताळीसारखे पण मोठे कंद येतात हे कंद शेतकऱ्यांकडून घेतले जातात हे क्रशरमध्ये दळले जातात यामुळे कंदांचा पांढरा गर (Pulp) आणि द्रव तयार होतो.
नंतर या गरामध्ये पाणी मिसळून चाळले जाते. यातून फायबर वेगळे होते व पांढरा स्टार्च वेगळा होतो हा मोठ्या टाक्यात ठेवून स्थिर केला जातो. घट्ट स्टार्च खाली तळाशी साठतो
हा ओलसर स्टार्च थोडा सुकवला जातो त्यानंतर त्याला एका गोलाकार यंत्रात टाकले जाते. यंत्राच्या हालचालीमुळे स्टार्चचे रूपांतर लहान-लहान मोत्यांसारख्या पांढऱ्या गोळ्यांमध्ये होते.
तयार झालेले ओले दाणे मोठ्या गरम कढयांवर किंवा वाफेच्या सिलिंडरवर भाजले जातात. यामुळे दाण्यांच्या वरचा थर शिजतो व साबुदाणा तयार होतो
या कॅसाव्हा झाडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक अत्यंत दुष्काळी, कमी पाऊस असलेल्या आणि निकृष्ट जमिनीतही उत्तम प्रकारे वाढू शकते.
तामिळनाडूनंतर, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये याचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांत स्थानिक आहारासाठी छोट्या प्रमाणावर लागवड होते.
या कंदामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. कॅसाव्हाचे पीठ नैसर्गिकरीत्या ग्लुटेन-मुक्त असते, ज्यांना ग्लुटेनची अॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
केवळ अन्न म्हणूनच नव्हे, तर कागद, कापड उद्योग, जैवइंधन (बायो-इथेनॉल), आणि विविध प्रकारच्या डिंकांच्या निर्मितीमध्ये कॅसाव्हा स्टार्चचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.