पुढारी वृत्तसेवा
जगात सर्वात जास्त मृत्यू कॅन्सरमुळे होतात. पण तुम्हाला माहीत आहे का, जर याचे लवकरात लवकर निदान झाले तर अनेक लोकांचे जीव वाचवता येतात.
बहुतेक कॅन्सर अगदी शांतपणे सुरू होतात किंवा त्यांची लक्षणे इतकी सामान्य असतात की त्यांच्याकडे लक्ष जात नाही.
सुरुवातीलाच निदान झाल्यास यावर पूर्णपणे उपचार करणे शक्य आहे. पण दुर्दैवाने, याची लक्षणे किरकोळ आजार समजून दुर्लक्ष केली जातात.
अचानक वजन घटणे
विनाकारण, अचानक शरीराचे १०% वजन कमी झाल्यास अलर्ट व्हा. सोबत थकवा वाढणे हे धोक्याचे संकेत असू शकते.
सतत थकवा
पुरेशी विश्रांती घेऊनही सतत अशक्तपणा जाणवणे सामान्य नाही. हे शरीरातील गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
गाठ किंवा सूज
स्तन, मान, काख किंवा जांघेत कोणतीही नवीन, विनाकारण गाठ दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा. बहुतांश गाठी कॅन्सर नसतात, पण तपासणी आवश्यक आहे.
तोंडातील अल्सर/जखम जी बरी होत नाहीये, किंवा रंग आकार बदलत आहे? हे स्किन किंवा ओरल कॅन्सरचे संकेत असू शकतात.
सतत खोकला आणि आवाज बसणे
३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला आणि घसा खवखवत असल्यास किंवा आवाजात अचानक बदल झाल्यास गंभीर व्हा. विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांसाठी.
असामान्य रक्तस्त्राव
urine किंवा vagina तून असामान्य रक्तस्त्राव होणे. सोबतच ॲनिमिया हे देखील प्रारंभिक लक्षण आहे.
अचानक बद्धकोष्ठता किंवा अतिसार दीर्घकाळ लागून राहणे. तसेच गिळण्यास किंवा पचन करण्यास त्रास होणे.