Raven Myth | कावळ्याचा मोठा भाऊ ‘रेवण’ खरंच भविष्य पाहू शकतो का?

Namdev Gharal

रेव्हन (Raven) नेमका कोणता पक्षी आहे हे पाहूया, रेव्हन हा कावळ्यांच्याच प्रजातीतील आकाराने खूप मोठा, जाड चोच असलेला आणि गडद काळा पक्षी आहे.

युरोपात याच्याविषयी अनेक आख्यायिका आहेत, हा भविष्य पाहतो असे मानले जाते. हा पक्षी प्रामुख्याने यरोप, उत्तर अमेरिका कॅनडा भारताचा विचार केल्यास हिमालयात बर्फाळ प्रदेशात आढळतो

युरोपातील ८ व्या ९ व्या शताकतील नॉर्स (Norse) संस्कृतीतील देव ओडीन यांच्याकडे दोन रेव्हन पक्षी होते ते संपूर्ण जगात फिरून भविष्यातील घटना रहस्ये ओडीनला सांगायचे अशी मान्यता असल्याने हे भविष्य पाहतो असा समज पसरला.

रेवण जादूने भविष्य पाहत नाही, तर त्याचे वैज्ञानिक कारण त्याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधनानुसार, रेव्हन माणसाच्या ४ वर्षांच्या मुलाइतके हुशार असतात

काहीवेळा ते पुढच्या काही तासांत किंवा दिवसांत काय घडणार आहे याचा अचूक अंदाज बांधून आधीच प्लॅनिंग करू शकतात. यामुळे काहींचा समज हा भविष्य पाहतो असा होतो

इतर पक्षी किंवा प्राणी आपली अन्नाची जागा शोधून काढतील हे रेवण आधीच ओळखतात. त्यामुळे ते मुद्दाम खोट्या ठिकाणी अन्न लपवण्याचे नाटक करतात आणि प्रत्यक्षात दुसरीकडेच अन्न सुरक्षित ठेवतात

माणसांप्रमाणेच रेवण एखाद्या वस्तू किंवा दिशेकडे इशारा करण्यासाठी आपल्या चोचीचा वापर करतात. प्राण्यांच्या जगात स्वतःच्या शरीराचा भाग वापरून विशिष्ट वस्तू दाखवण्याची ही क्षमता अत्यंत दुर्मिळ आहे

रेवण मानवी चेहरे अचूक लक्षात ठेवतात. ज्या माणसाने त्यांना त्रास दिला आहे, तो पुढे काय हालचाल करू शकतो याचा अंदाज घेऊन ते आधीच सावध होतात आणि इतरांनाही इशारा देतात

रेवण केवळ पोपटासारखा मानवी आवाजच नाही, तर बंदुकीचा आवाज, कारचे इंजिन किंवा प्राण्यांचे आवाजही हुबेहूब काढू शकतात. पाळलेले काही रेवण माणसांपेक्षाही स्पष्ट बोलताना नोंदवले गेले आहेत

रेवण कोणताही तांत्रिक किंवा जादुई चमत्कार करून भविष्य पाहत नाही; तर त्याची तीव्र निरीक्षणशक्ती, अफाट स्मरणशक्ती आणि परिणामांचा आगाऊ अंदाज लावण्याची बुद्धी यांमुळे लोकांना वाटते की त्याला भविष्य कळते.