पुढारी वृत्तसेवा
कानाचे चुंबन घेतल्याने निर्माण होणारे सक्शन व्हॅक्यूमसारखा दाब निर्माण करते, ज्यामुळे कानाच्या पडद्याला नुकसान होऊ शकते.
बाळाचे कानाचे पडदे नाजुक असतात. ते थोड्याशा दाबामुळेही फाटू शकतात किंवा त्याच्यावर प्रभाव पडू शकतो.
या सक्शनमुळे कानांच्या नसांमध्ये (Cochlea) कंपन निर्माण होते, ज्यामुळे बाळाला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.
चुंबन घेताना निर्माण होणारा ताण कानाच्या आतील लहान हाडांवर पडू शकतो. ज्यामुळे ते जागेवरून हालू शकतात.
वैज्ञानिक संशोधन असे सूचित करते की कानावर थेट सक्शनमुळे टिनिटस सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
कानाजवळ जोरात ओरडणे किंवा दबाव मुलांची ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते.
प्रेम व्यक्त करण्यासाठी कपाळावर किंवा गालाचे चुंबन घेता येईल मात्र कानावर चुंबन घेणे टाळा.
लोकांपर्यंत माहिती पोहोचविणे इतकाच या माहितीचा हेतू आहे. लहान मुलांच्या कोणत्याही समस्यांसाठी तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.