shreya kulkarni
घरात आढळणाऱ्या पाली सामान्यतः विषारी नसतात. त्यांच्या दंशामुळे मृत्यू होत नाही.
वैद्यकीय शास्त्रानुसार, भारतात आढळणाऱ्या घरगुती पाली ‘हाउस गेको’ (House Gecko) प्रजातीच्या असून, त्या मानवांसाठी धोकादायक नसतात.
घरातील पाल मानवांपासून दूर राहते. अत्यंत क्वचित प्रसंगीच ती मनुष्याला दंश करते.
पाल विषारी नसली तरी, तिच्या तोंडात जिवाणू (Bacteria) असू शकतात. त्यामुळे दंश झाल्यास जंतुसंसर्ग होऊ शकतो.
दंश झालेली जागा साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावी, त्यावर जंतुनाशक (Antiseptic) लावावे आणि कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर पाल अन्नात पडली आणि ते अन्न खाल्ले गेले, तर अन्न विषबाधा (Food Poisoning) होऊ शकते, जी गंभीर स्वरूपाची असू शकते.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे पाली अधिक प्रमाणात दिसतात. त्यामुळे अन्नपदार्थ झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
अन्नामध्ये पाल पडली आहे की नाही, अशी शंका जरी आली, तरी ते अन्न खाऊ नये. ते अन्न त्वरित फेकून द्यावे.