Poha For Diabetes Patients : मधुमेहाच्या रुग्णांनी पोहे खावेत की नको?

पुढारी वृत्तसेवा

भारतात न्याहारीसाठी 'कांदेपोहे' हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पण सध्या पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते, असे अनेक रील्स व्हायरल होत आहेत. यामागचं नक्की तथ्य काय, ते सविस्तर जाणून घेऊया.

पांढऱ्या पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) ५५ ते ७० दरम्यान असतो, जो मध्यम ते उच्च श्रेणीत येतो. त्यामुळे जर तुम्ही फक्त आणि फक्त पोहेच खाल्ले, तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पोह्यांचे सेवन केले, तर रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढण्याचा धोका असतो.

अजिबात नाही! तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असणारे रुग्ण सुद्धा पोहे खाऊ शकतात. बहुतांश डायबेटोलॉजिस्ट आणि आहारतज्ज्ञांच्या मते, पोहे हे 'डायबिटीज फ्रेंडली' आहेत; मात्र त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे.

पोहे खाताना त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी एका वेळी खूप जास्त पोहे खाणे टाळावे. 'प्रमाणात खाणे' हाच यावरील मुख्य उपाय आहे.

आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मधुमेह असणारे रुग्ण एका वेळी १ वाटी (सुमारे ५० ते ८० ग्रॅम) पोहे सुरक्षितपणे खाऊ शकतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि साखरही नियंत्रणात राहते.

पोह्यांचा जीआय (GI) कमी करण्यासाठी त्यात भरपूर प्रमाणात शेंगदाणे, मटार, गाजर, कांदा आणि मोड आलेली कडधान्ये मिक्स करा. भाज्यांच्या फायबरमुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही.

थोडक्यात सांगायचे तर, मधुमेहामध्ये कोणताही पदार्थ वर्ज्य नसतो, फक्त त्याचे प्रमाण योग्य असावे लागते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने १ वाटी पोहे नक्की खा आणि निरोगी राहा!