चार्जिंगला लावलेला फोन अचानक पेटू शकतो?, या चुका टाळा!

पुढारी वृत्तसेवा

स्मार्टफोनला आग का लागते?

फोनमधील लिथियम-आयन बॅटरी अतिउष्ण झाल्यास किंवा अंतर्गत शॉर्ट सर्किट झाल्यास आग लागण्याचा धोका निर्माण होतो.

थर्मल रनअवे म्हणजे काय?

बॅटरीचे तापमान सुरक्षित मर्यादेपेक्षा वाढल्यास तिच्यात अनियंत्रित रासायनिक साखळी प्रतिक्रिया सुरू होते. यालाच थर्मल रनअवे म्हणतात.

निकृष्ट चार्जरचा वापर

स्वस्त आणि प्रमाणित नसलेले चार्जर किंवा केबल वापरल्याने विद्युत पुरवठ्यात बिघाड होऊन शॉर्ट सर्किटचा धोका वाढू शकतो.

बॅटरी खराब होणे

फोन खाली पडणे, त्यावर दाब पडणे किंवा टोकदार वस्तू लागल्याने बॅटरीचे अंतर्गत नुकसान होऊ शकते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.

उशीखाली फोन ठेवून झोपणे

फोन उशीखाली किंवा बेडवर ठेवून चार्जिंग केल्यास उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे फोन अतिउष्ण होऊ शकतो.

चार्जिंग करताना गेमिंग

चार्जिंग सुरू असताना हाय-ग्राफिक्स गेम खेळणे, 4K व्हिडीओ पाहणे किंवा सतत रील्स स्क्रोल करणे यामुळे प्रोसेसर आणि बॅटरी गरम होऊ शकतात.

बॅटरीतील तांत्रिक दोष

बॅटरी तयार करताना किंवा फोनच्या असेंब्लीदरम्यान राहिलेल्या त्रुटींमुळे अंतर्गत शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते.

स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?

नेहमी प्रमाणित चार्जर वापरा, खराब झालेली बॅटरी त्वरित बदलून घ्या, फोन झाकून चार्ज करू नका आणि अतिउष्ण होणाऱ्या फोनकडे दुर्लक्ष करू नका.