डोके कापल्यानंतर कोंबडी खरंच जिवंत राहू शकते का?

पुढारी वृत्तसेवा

‘मिरॅकल माईक’ची गोष्ट

डोके नसतानाही 18 महिने जिवंत राहिलेल्या कोंबडीची कथा जगभर प्रसिद्ध.

विज्ञान काय सांगतं?

तज्ज्ञांच्या मते, डोक्याशिवाय कोंबडी जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही.

हालचाल का दिसते?

डोके कापल्यानंतर दिसणारी धावपळ ही स्नायूंच्या आकुंचनांमुळे होते.

फक्त काही सेकंदच

ही हालचाल साधारण 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंतच टिकते.

ब्रेन डेथ म्हणजे काय?

डोके कापल्यानंतर प्रथम ‘ब्रेन डेथ’ (मेंदूचा मृत्यू) होतो.

कार्डियाक डेथ

काही सेकंदांनी हृदयही बंद पडते आणि शरीर पूर्णपणे मृत होते.

शुद्ध नसते

डोके धडावेगळे झाल्यानंतर कोंबडीमध्ये दिसणारी हालचाल ही केवळ मज्जासंस्थेतील शेवटच्या लहरींमुळे असते.

दुर्मीळ अपवाद

‘मिरॅकल माईक’सारख्या घटनेत मेंदूचा काही भाग शरीराला जोडलेला राहिल्यामुळे ते शक्य झाले असावे, असे मानले जाते.