Camphor Tree : कापराचे झाड पाहिले आहे का? कसा तयार होतो भिमसेनी व साधा कापूर

Namdev Gharal

कापूर आपण दररोज वापरणारा पदार्थ, देवपूजेसाठी लागणारा महत्‍वाची गोष्ट या कापरात भिमसेनी व साधा कापूर असे दोन प्रकार असतात

यामध्ये भीमसेनी (नैसर्गिक) कापूर हा Cinnamomum camphora नावाच्या वृक्षाच्या खोड व साल,पाने यापासून मिळवला जातो.

याउलट, बाजारातील साधा कापूर हा मुख्यतः पाइन (देवदार) वृक्षाच्या रसायनांवर किंवा खनिज तेलावर रासायनिक प्रक्रिया करून कृत्रिमरीत्या बनवला जातो

भिमसेनी कापूर तयार करण्यासाठी कापराच्या झाडाच्या लाकडाचे बारीक तुकडे करून मोठ्या हंड्यांमध्ये किंवा बॉयलरमध्ये वाफेच्या साहाय्याने उकळले जातात.

वाफेसोबत झाडातील तेलाचे बाष्पीभवन होते, जे थंड केल्यावर स्फटिक (Crystals) रूपात जमा होते; याला भीमसेनी कापूर म्हणतात.

तर साधा कापूर बनवण्यासाठी टर्पेन्टाइन तेलातून 'पायनीन' (Pinene) नावाचा घटक वेगळा केला जातो. विविध रासायनिक प्रक्रियांद्वारे याचे रूपांतर 'कॅम्पोफोर'पावडरमध्ये घडवून आणले जाते.

तयार झालेली कृत्रिम कापूर पावडर कॉम्प्रेसिंग मशीनमध्ये घालून विशिष्ट साच्यांद्वारे वड्या किंवा गोळ्यांच्या आकारात दाबून तयार केली जाते.

भीमसेनी कापूर कोणत्याही साच्यात न टाकता थेट नैसर्गिक खड्यांच्या किंवा स्फटिकांच्या अनियमित आकारातच विकला जातो.भीमसेनी कापूर पाण्यात तरंगतो आणि जाळल्यास काळा धूर न सोडता पूर्णपणे जळून जातो, मागे कसलीही राख उरत नाही.

साध्या किंवा भेसळयुक्त कापरामध्ये मेण व रसायने असल्याने तो जळताना काळा धूर निघतो आणि शेवटी पांढरा थर किंवा राख शिल्लक राहते.

भीमसेनी कापूर नैसर्गिक असल्याने तो औषधी, आयुर्वेदिक उपचार, खाण्यातील पदार्थ आणि पूजेसाठी सुरक्षित मानला जातो.

साधा कापूर हा प्रामुख्याने रासायनिक घटकांपासून बनत असल्याने तो केवळ आरती, होम-हवन किंवा कीटकनाशक म्हणूनच वापरला जातो.