Calcium Side Effects : दररोज कॅल्शिअमच्या गोळ्या खाताय? तर सावधान!

Namdev Gharal

सध्या भारतामध्ये अनेकांना कॅल्शियम डेफेशिएन्सी दिसून येते. यावर डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्या सुरु करतात पण कॅल्शियम हाडांसाठी अमृत पण अतिवापर किडनीसाठी विष ठरू शकतो

विशेषत वयाच्या चाळीशीनंतर प्रत्‍येकजणाला मानदुखी, कंबरदुखी हे त्रास सुरु होतात. यावर उपाय म्हणजे कॅश्लियमच्या गोळ्या हे जरी योग्य असले तर काहीजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वर्षानूवर्षे या गोळया घेतात

पण या अतिवापर ठरु शकतो घातक कारण शरीरात कॅल्शियमचे प्रमाण जास्त झाल्यास, किडनी ते लघवीवाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत कॅल्शियमचे खडे तयार होऊ शकतात

अन्नातून मिळणाऱ्या कॅल्शियममुळे किडनी स्टोनचा धोका फारसा नसतो, पण गोळ्यांमुळे हा धोका २०% ते ३०% वाढतो, असे काही संशोधनात समोर आले आहे

कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन: किडनी स्टोनचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम आणि ऑक्झलेट (काही अन्नपदार्थांमध्ये असणारे तत्व) एकत्र येतात, तेव्हा त्यांचे स्फटिक बनतात

किडनीवर पडणारा ताण: गोळ्यांमधील कॅल्शियम शरीर एकाच वेळी वेगाने शोषून घेते. अतिरिक्त कॅल्शियम फिल्टर करताना किडनीवर ताण पडतो

अनेकजण सांधेदुखी किंवा हाडे मजबूत करण्यासाठी स्वतःच मेडिकलमधून कॅल्शियमच्या गोळ्या आणून वर्षानुवर्षे घेतात

पाणी कमी पिणे: गोळ्या सुरू असताना पुरेसे पाणी न प्यायल्यास लघवी घट्ट होते आणि कॅल्शियमचे खडे सहज तयार होतात.

व्हिटॅमिन D चा अतिवापर: व्हिटॅमिन D शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते. याचे प्रमाणही जास्त झाल्यास धोका वाढतो.

सुरक्षित कॅल्शियमचे स्त्रोत: दूध, दही, पनीर, नाचणी, पालेभाज्या आणि तीळ या नैसर्गिक स्रोतांतून कॅल्शियम मिळवा.

योग्य डोस घ्या : डॉक्टरांनी लिहून दिलेला डोस आणि कालावधी (उदा. २-३ महिने) यापेक्षा जास्त काळ गोळ्या घेऊ नका.

हायड्रेशन: कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असताना दिवसातून २.५ ते ३ लिटर पाणी पिणे अनिवार्य आहे.