पुढारी वृत्तसेवा
खाण्याचा चूना (Calcium Hydroxide) जर योग्य पद्धतीने अगदी छोटीशी गोळी दररोज सेवन केल्यास शरीराला उत्तम आरोग्यदायी फायदे मिळतात. आयुर्वेदामध्येही या प्रमाणाला अत्यंत गुणकारी मानले गेले आहे.
हे प्रमाण अगदी कमी म्हणजे एक गव्हाच्या दाण्याइतके असावे, तसेच ते ताक दही किंवा पाणी यामध्ये व्यवस्थित विरघळवून घेणे आवश्यक असते, थेट सेवन केल्यास जिभेला भाजू शकते
चून्यामध्ये उच्च दर्जाचे कॅल्शियम असते. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते आणि ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) सारख्या त्रासापासून बचाव होतो.
हाडे, कंबर आणि सांधेदुखीपासून आराम: वयोमानानुसार होणारी गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा मणक्याचे आजार कमी होण्यास हाडांची घनता वाढवून मदत होते.
दात मजबूत होतात: दातांची मुळे घट्ट होतात, दात हलणे किंवा दात किडण्याची शक्यता कमी होते. वाढत्या वयातील मुलांना हे प्रमाण दिल्यास त्यांच्या हाडांची योग्य वाढ होऊन उंची वाढण्यास मदत होते.
मासिक पाळीच्या तक्रारी, गरोदरपणात (डॉक्टरांच्या सल्ल्याने) कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी, तसेच मेनोपॉजच्या (रजोनिवृत्ती) काळात हाडांची झीज रोखण्यासाठी चुना अत्यंत प्रभावी ठरतो.
केस आणि नखांचे आरोग्य: कॅल्शियमच्या योग्य पुरवठ्यामुळे नखे तुटणे थांबते आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
किडनी स्टोन (मुतखडा): ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्यांच्या शरीरात खडे तयार होण्याची प्रवृत्ती आहे, त्यांनी चुन्याचे सेवन अजिबात करू नये.
प्रमाण नेहमी एका गव्हाच्या दाण्याएवढेच असावे. प्रमाणापेक्षा जास्त चुना घेतल्यास पोटात जळजळ, उलट्या किंवा अल्सरचा त्रास होऊ शकतो. ही माहिती लोकपरंपरेतील आहे इतर कोणता त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा