पुढारी वृत्तसेवा
कॉटन हे शरीरावर वापरायला हलके, आरामदायक, ओलावा शोषून घेण्याची क्षमता असते. कॉटनच्या कपड्यांमुळे आपल्या त्वचेवर रॅशेसही येत नाहीत.
सध्या बाजारात बनावट आणि सिंथेटिक कॉटन विक्री होत असते. त्यामुळे 100 टक्के कॉटन कसे ओळखायचे चला पाहुयात...
खरे कॉटन ओळखण्यासाठी कापडाचा छोटा भाग मुठीत धरून तो गुंडाळा अन् सोडा. यावेळी त्यावर जास्त घड्या (wrinkles) तशाच राहिल्या तर ते कॉटन आहे.
याउलट सिंथेटिक कापड मिक्स ब्लेंडचे फॅब्रिक चुरगाळून सोडल्यानंतर पुन्हा आपल्या शेपमध्ये येते.
कपडा खरेदी करताना लेबल पाहा.. त्यावर 100 टक्के कॉटन लिहिले असेल तर ते खरे आहे. जर त्यावर कॉटन ब्लेंड, मिक्स फॅब्रिक लिहिल असेल तर बनावट आहे.
तुम्ही कॉटनचे कापड खरेदी करत असाल तर विणकामाकडे लक्ष द्या. कॉटन कापड सरळ आणि स्वच्छ असते, जर धाग्यांमध्ये प्लास्टिकची चमक असेल किंवा ते असमान विणकाम असेल तर ते भेसळयुक्त असू शकते.
कपड्यावर पाण्याचे काही थेंब टाका. खरे कॉटन पाणी लवकर शोषून घेते आणि पसरवते. कृत्रिम कापड सहसा वरच्या बाजूला पाणी धरून ठेवते.
छोटा कापडाचा तुकडा घ्या आणि तो काळजीपूर्वक जाळून टाका. खऱ्या कॉटनला कागदासारखा वास येतो आणि जळल्यावर हलकी राख सोडते.
दुसरीकडे, कृत्रिम कापड आकुंचन पावते आणि प्लास्टिकसारखा वास येतो. या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला खऱ्या कापसाची ओळख पटवता येईल.