Buttermilk Benefits : ताक ठरते पोटाचे नैसर्गिक कवच; वाढतात उपयुक्त जीवाणू

Asit Banage

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

वाढत्या उष्णतेमुळे या दिवसांत पोटाच्या आणि पचनसंस्थेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येतात.

संशोधनानुसार, सततच्या उष्णतेमुळे आपल्या आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे म्हणजेच जीवाणूंचे संतुलन बिघडते.

ज्यामुळे 'लॅक्टोबॅसिलस' सारखे शरीराला फायदेशीर असणारे बॅक्टेरिया कमी होऊ लागतात.

अशा परिस्थितीत ताक पिणे पोटासाठी रामबाण उपाय ठरू शकते.

ताकामध्ये जिवंत 'लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया' भरपूर प्रमाणात असतात.

हे बॅक्टेरिया पोटातील हानिकारक घटकांशी सक्रियपणे लढतात आणि पोटामध्ये अधिक संरक्षक म्युकस तयार करण्यास मदत करतात.

त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे म्हणजे पोटाच्या आरोग्याला एक प्रकारे नैसर्गिक कवच देण्यासारखे आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...