पुढारी वृत्तसेवा
फुलपाखराचे पूर्ण आयुष्य अंडी, सुरवंट (अळी), कोष आणि फुलपाखरू अशा चार टप्प्यांतून जाते.
मादी फुलपाखरू झाडाच्या पानावर छोटी अंडी घालते. ती अशाच पानांची निवड करते जी पाने पुढे जन्माला येणाऱ्या सुरवंटाला अन्न म्हणून खाता येतील.
अंड्यातून बाहेर पडल्यावर सुरवंटाचे मुख्य काम फक्त खाणे आणि वाढणे हे असते. शक्ती मिळवण्यासाठी तो सर्वात आधी स्वतःच्या अंड्याचे कवचच खातो!
खाऊन-खाऊन सुरवंट मोठा होत जातो तसो तो आपली जुनी त्वचा बदलतो (यालाच 'कात टाकणे' म्हणतात). या काळात तो मूळ आकारापेक्षा १०० पटीने वाढू शकतो.
पूर्ण वाढ झाल्यावर सुरवंट स्वतःभोवती एक सुरक्षित कवच तयार करतो, ज्याला 'कोष' म्हणतात.
या कोशाच्या आत अतिशय चमत्कारिक बदल घडतात. सुरवंटाच्या शरीराची पूर्णपणे पुनर्रचना होऊन त्याचे रूपांतर फुलपाखरात होते.
कोशातून बाहेर पडताना फुलपाखराचे पंख ओले आणि मऊ असतात. उडण्यापूर्वी ते पंख नीट पसरवून वाळवावे लागतात.
मोठे झाल्यावर फुलपाखरू फुलांतील मध खाते आणि पुन्हा अंडी घालते. अशा प्रकारे हे निसर्गाचे चक्र पुन्हा नव्याने सुरू होते.