1 Rupee recharge plan: फक्त १ रुपयात २४ दिवस अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, 'या' कंपनीची जबरदस्त ऑफर

पुढारी वृत्तसेवा

मोबाईल रिचार्ज सतत महाग होत चालल्यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे, विशेषतः दोन सिमकार्ड वापरणाऱ्या युजर्ससाठी हा मोठा आर्थिक भार ठरत आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड'ने (BSNL) एक अत्यंत आकर्षक आणि धमाकेदार ऑफर आणली आहे.

अवघ्या १ रुपयात २४ दिवस सिम चालू ठेवण्याची ही सुविधा नवीन ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

बीएसएनएलने आणलेला हा १ रुपयांचा प्लॅन प्रत्यक्षात एक 'फर्स्ट रिचार्ज कूपन' (FRC) आहे. याचा अर्थ हा लाभ केवळ अशा ग्राहकांना मिळणार आहे, जे कंपनीचे नवीन सिमकार्ड खरेदी करत आहेत.

या विशेष ऑफरच्या माध्यमातून अधिकाधिक नवीन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. हा प्लॅन संपूर्ण देशात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हा १ रुपयांचा प्लॅन २४ दिवसांच्या सर्व्हिस व्हॅलिडिटीसह येतो.

यामध्ये युजर्सना देशभरात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १ जीबी डेटा (एकूण २४ जीबी डेटा) मिळतो. तसेच, दररोज १०० फ्री एसएमएस ची सुविधाही यात समाविष्ट आहे.

या हिशोबाने विचार केला तर या प्लॅनचा खर्च अवघा ४ पैसे प्रति दिन एवढा येतो. कंपनीच्या नियमांनुसार, एका ग्राहकाला या प्लॅनचा लाभ फक्त एकदाच (नवीन सिम घेताना) घेता येतो.

जुन्या सिमकार्डवर हा प्लॅन लागू होत नाही. जुने सिम सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना नियमित प्रीपेड प्लॅननेच रिचार्ज करावा लागेल.