दररोज फक्त १० मिनिटे चालणे तुमचे आयुष्य बदलू शकते, असे संशोधन सांगते..वेगाने चालल्याने अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो..१० मिनिटे जलद चालल्याने मृत्यूचा धोका सुमारे ७% ने कमी होऊ शकतो..दररोज २० मिनिटे चालल्यास हा धोका १३% पर्यंत घटतो. तर ३० मिनिटे वेगाने चालल्यास अकाली मृत्यूचा धोका १७% ने कमी होतो..ब्रिस्क वॉकमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहते..नियमित चालण्यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते..पचनसंस्था सुधारते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. .हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे..'जामा इंटरनॅशनल' या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ही माहिती समोर आली आहे.