Brinjals Benefits: वांग्यात कोणती पोषक तत्वे असतात... आपण उगाच वांग तर खात नाही ना?

Anirudha Sankpal

कमी कॅलरीज आणि फायबर

वांग्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून १ कप शिजवलेल्या वांग्यातून फक्त २० ते ३५ kcal कॅलरीज आणि ३ ग्रॅम फायबर मिळते.

पोषक तत्त्वांचा खजिना

यामध्ये शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन सी, के, बी-६ आणि पोटॅशियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

अँटीऑक्सिडंट्स आणि मेंदूचे रक्षण

याच्या सालीमध्ये 'नासूनिन' नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे मेंदूच्या पेशींचे रक्षण करते आणि वाढत्या वयाचा वेग (Anti-aging) कमी करते.

हृदयाचे आरोग्य

वांग्यातील पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब (BP) नियंत्रित ठेवतात आणि शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करून हृदयाचे आजार टाळतात.

डायबिटिज नियंत्रण

फायबरचे प्रमाण जास्त आणि कार्बोहायड्रेट्स कमी असल्याने रक्तातील साखर एकदम वाढत नाही, ज्यामुळे मधुमेहींसाठी वांगं उत्तम मानले जाते.

वजन आणि पचनक्रिया

हे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि यातील फायबर बद्धकोष्टतेचा त्रास दूर करते.

वात आणि ॲलर्जी

आयुर्वादानुसार वांगं वात वाढवणारे असल्याने सांधेदुखी किंवा गॅसचा त्रास असलेल्यांनी आणि ॲलर्जीची शक्यता असलेल्यांनी ते मर्यादित खावे.

किडनी स्टोनचा धोका

वांग्यामध्ये 'ऑक्झलेट'चे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ज्यांना किडनी स्टोन (खडा) होण्याचा त्रास आहे त्यांनी वांगं खाणे टाळावे.

खाण्याची योग्य पद्धत

वांगं हे हृदय, मेंदू आणि पोटासाठी गुणकारी आहे, परंतु ते जास्त तेलकट न बनवता भरीत किंवा उकडलेल्या भाजीच्या स्वरूपात खाणे अधिक फायदेशीर ठरते.

येथे क्लिक करा