अरुण पाटील
बॉलीवूडची अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेते. आता तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ती या फाेटाेमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
अनन्या पांडे प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या पांढऱ्या मोत्याच्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.
अनन्याचा हा ड्रेस पूर्णपणे पांढऱ्या मोत्यांनी जडलेला आहे. ड्रेसचा खालचा भाग वक्र आकारात बनवला आहे. ताे ड्रेसपरिधान केल्यानंतर अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
अनन्याने तिचा स्टायलिश ड्रेस मॅचिंग इअररिंग्जसोबत घातला आहे. तिने तिच्या हातावर पांढऱ्या मोत्यांचा थर अशा प्रकारे घातला आहे की तो ब्रेसलेटसारखा दिसतो.
अबू जानी संदीप खोसला या ड्रेसवर अनन्याने न्यूड मेकअप केला आहे. ग्लॉसी लिपस्टिक आणि ब्लॅक लाइनर तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
हा लूक अधिक खास बनवण्यासाठी अनन्याने मेटॅलिक स्ट्रॅपी हील्स घातल्या होत्या. या सिल्व्हर-टच हील्स तिच्या मोत्याच्या ड्रेससोबत परफेक्ट कॉम्बिनेशन करत होत्या. रेड कार्पेटवर चालताना तिचे प्रत्येक पाऊल आणखी ग्लॅमरस दिसत होते.