पुढारी वृत्तसेवा
का वाढतोय धोका?
अलिकडच्या काळात तरुण महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) वाढताना दिसत आहे.
मुख्य कारणे कोणती?
हार्मोनल बदल, उशिरा लग्न, उशिरा मातृत्व, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली ही प्रमुख कारणे आहेत.
जेनेटिक फॅक्टरही महत्त्वाचा
कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्यास धोका अधिक असू शकतो.
सुरुवातीची लक्षणं ओळखा
स्तनात गाठ जाणवणे, आकार बदलणे किंवा त्वचेत बदल दिसणे ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
निप्पलमध्ये बदल
निप्पलमधून स्त्राव येणे किंवा त्याचा आकार बदलणे हेही संकेत असू शकतात.
वेदना नेहमीच असतात का?
सुरुवातीला वेदना नसू शकतात, त्यामुळे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते.
नियमित तपासणी का आवश्यक?
लवकर निदान झाल्यास उपचार सोपे आणि प्रभावी होतात.
सेल्फ-ब्रेस्ट एक्झाम करा
महिलांनी महिन्यातून एकदा स्वतः तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
जीवनशैलीत बदल करा
संतुलित आहार, व्यायाम आणि ताण कमी ठेवणे हे प्रतिबंधासाठी महत्त्वाचे.