Cooking in Brass Pots: फॅशन म्हणून पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणं करणं, जेवणं कितपत योग्य?

Anirudha Sankpal

पितळेच्या भांड्यात जेवण करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

या धातूंमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यास मदत होते.

या भांड्यात शिजवलेले अन्न पचनसंस्थेसाठी चांगले असते व पचनक्रिया सुधारते.

पितळेच्या भांड्यात जेवण केल्यास आम्लपित्त (Acidity) नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

जेवणाचे भांडे आतून कल्हई (Tin Plating) केलेले असणे अत्यावश्यक आहे.

कल्हई केल्याने पितळ्यातील तांबे (Copper) अन्नाच्या थेट संपर्कात येत नाही.

कल्हईशिवाय आम्लयुक्त पदार्थ (लिंबू, दही) शिजवल्यास जास्त तांबे शरीरात जाऊन पोटदुखी होऊ शकते.

कल्हईचा मुलामा वेळोवेळी तपासावा आणि निघाल्यास तो पुन्हा करून घ्यावा.

कल्हई केलेले पितळेचे भांडे फॅशन व आरोग्याच्या दृष्टीने जेवणासाठी योग्य आहे.

येथे क्लिक करा