पुढारी वृत्तसेवा
ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान 'सुपरसॉनिक क्रूझ' क्षेपणास्त्र मानले जाते.
भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक
हे क्षेपणास्त्र भारताची 'DRDO' आणि रशियाची 'NPO' यांनी मिळून विकसित केले आहे.
नावाचा खास अर्थ
'ब्रह्मोस' हे नाव भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा या दोन नद्यांच्या नावावरून ठेवले आहे.
ध्वनीपेक्षाही वेगवान
याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट म्हणजेच जवळपास २.८ मॅक इतका प्रचंड आहे.
त्रिशक्तीचा कणा
ब्रह्मोस जमिनीवरून, हवेतून आणि समुद्राखालील पाणबुडीतूनही अचूक मारा करण्यास सक्षम आहे.
अचूक निशाणा
या क्षेपणास्त्राची अचूकता इतकी जबरदस्त आहे की, शत्रूच्या रडारलाही याला पकडणे कठीण जाते.
जागतिक मागणी
भारताने आता ब्रह्मोसची निर्यातही सुरू केली असून फिलीपिन्स हा हे क्षेपणास्त्र घेणारा पहिला देश ठरला आहे.
भारतीय सैन्याची शान
'डागा आणि विसरा' (Fire and Forget) या तंत्रज्ञानामुळे ब्रह्मोस भारतीय संरक्षण दलाचे सर्वात घातक शस्त्र बनले आहे.