Namdev Gharal
अनेक हौशी लोक बॉस्कर या जातीचा कुत्रा पाळतात, हा दिसायला मस्क्युलर , तसेच ताकदवादन जबडे असलेला जर्मन ब्रिड आहे
बॉक्सर नाव खेळताना किंवा संवाद साधताना हे कुत्रे पुढचे दोन्ही पंजे माणसांसारखे हवेत उचलून 'बॉक्सिंग'सारखी हालचाल करतात, म्हणूनच त्यांना हे नाव मिळाले. मूळचे हे जर्मनीतील ब्रीड आहे.
बॉक्सर कुत्र्यांच्या चाव्याची ताकद सुमारे २३० PSI इतकी शक्तिशाली असते. सावज किंवा एखादी वस्तू तोंडात घट्ट पकडलेली असतानाही ते नाकाने सहज श्वास घेऊ शकतात.
रुंद छाती, मजबूत स्नायू, लहान चमकदार केस आणि चौकोनी सपाट थुथू (Brachycephalic snout) ही यांची प्रमुख ओळख आहे. यामुळे हा रुबाबदार आणि मस्क्युलर दिसतो
शरीराने अत्यंत पिळदार आणि धावण्यासाठी चपळ अशी यांची ॲथलेटिक शरीरयष्टी असते. हे मूळचे शिकारी आणि 'वर्किंग डॉग' असल्याने त्यांच्यात प्रचंड स्टॅमिना असतो.
यांना घरात शांत बसणे आवडत नाही; भरपूर धावणे, उड्या मारणे आणि कठीण ट्रेनिंग सहज पेलणे ही यांची ताकद आहे.
हे कुत्रे मालकाप्रती अढळ निष्ठा ठेवतात, बॉक्सर आपल्या मालकाच्या अगदी सावलीसारखे (Shadow Dog) मागे-मागे राहतात.
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे नेहमी सतर्क असतात आणि संकट आल्यास स्वतःचा जीव धोक्यात घालून मालकाचे रक्षण करतात.
बाहेरून अत्यंत गंभीर आणि धाकधूक निर्माण करणारे वाटत असले, तरी कुटुंबातील मुलांसोबत हे अत्यंत सहनशील, खोडकर आणि काळजीवाहू मित्रासारखे वागतात.