पुढारी वृत्तसेवा
सध्या ट्रेडिंगमध्ये असलेल्या बॉटल एक्सरसाईज काय आहे आणि त्यामुळे काय काय फायदे होतात हे पाहू
'बॉटल एक्सरसाइज' (Bottle Exercise) हा व्यायाम करण्याचा एक अतिशय सोपा, स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे.
पाण्याची बॉटल ही रिकमी बॉटल घेऊन व भरलेल्या बॉटल असे दोन्ही प्रकारे व्यायाम करता येतो. जीममध्ये जायला वेळ नाही अशांसाठी तर हे खूपच फायदेशीर ठरते
रिकामी बाटली हातात धरून किंवा खांद्यावर ठेवून हळुवार हालचाली केल्यास सांधे मोकळे होण्यास मदत होते. याला 'मोबिलिटी ड्रिल्स' म्हणतात.
पाठीमागे एक मागे बॉटल या हातातून त्या हातात देण्याचा व्यायाम तुम्ही ५० वेळा केला तर तुमचे पुढे झुकलेले पोश्चर योग्य होईल
बॉटल खांद्यावर ठेऊन कोपर बाजूकडून समोर असे ५० सेट केले तर तुमच्या मानेच्या व खांद्याची दुखणी कमी होतील. मानेच्या बाजूचे स्नायू मजबूत होतील
बाटल्या हातांत धरून त्या खांद्याच्या रेषेत वर-खाली केल्याने (Lateral Raises) खांद्यांचे स्नायू मजबूत होतात आणि पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत होते.'
साध्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी भरून त्यांचा वापर डबेल्सप्रमाणे करता येतो यामुळे बायसेप ट्रायसेपचाही व्यायाम करात येतो
तुम्ही घरच्या घरी, ऑफिसमध्ये किंवा प्रवासात असतानाही रिकाम्या वेळेत हा व्यायाम करू शकता. यामुळे स्नायूंची ताकद वाढून खांदा मानेचे त्रास कमी होतील
जर तुम्ही खांद्यावर रिकामी बाटली ठेवून चालण्याचा किंवा उभे राहण्याचा सराव केला, यामुळे 'कुबड' काढण्याची सवय कमी होते आणि तुमचा पोश्चर सुधारतो