पुढारी वृत्तसेवा
सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या युद्धपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधले आहे ते नव्या अभिनेत्रींनी.
या चित्रपटात आन्या सिंग आणि मेधा राणा या दोन तरुण अभिनेत्रींना मोठी संधी मिळाली आहे. या दोघींसाठी हा चित्रपट करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो.
आन्या सिंग चित्रपटात अहान शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. एका सैनिकाच्या पत्नीची भावनाप्रधान भूमिका साकारणे हे आन्यासाठी मोठे आव्हान असेल.
आन्याने २०१३ पासून कामाला सुरुवात केली होती, पण आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजमधील 'सान्या'च्या भूमिकेमुळे ती खरी प्रकाशझोतात आली.
आन्याने 'कैदी बँड', 'स्त्री २', 'खो गये हम कहाँ' आणि 'जी करदा' सारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. आता 'बॉर्डर २' मध्ये ती आपली जादू दाखवण्यास सज्ज आहे.
मेधा राणा
२५ वर्षांची मेधा राणा चित्रपटात वरुण धवनच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. वरुणसोबतची तिची फ्रेश जोडी चाहत्यांना आकर्षित करत आहे.
मेधाचे वडील भारतीय लष्करात होते. तिने वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली आणि २०१७ मध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबई गाठली.
मेधाने 'लंडन फाइल्स' सीरिजमधून पदार्पण केले होते. तसेच ती 'बरसात' म्युझिक व्हिडिओ आणि 'फ्रायडे नाईट प्लॅन' या चित्रपटातही झळकली आहे.
या दोघींसोबतच चित्रपटात सोनम बाजवा आणि मोना सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.