पुढारी वृत्तसेवा
१) गाजराचा पौष्टिक हलवा :
१ किलो किसलेले गाजर ४ लिटर दुधात उकळून घ्या. त्यात २५० ग्रॅम शुद्ध तूप आणि १० बदाम घालून मिश्रण भाजावे.
हे मिश्रण काचेच्या भांड्यात भरून ठेवा.
दररोज ५० ग्रॅम हे मिश्रण खाऊन वरून कोमट दूध प्यावे.
सलग एक महिना हा प्रयोग केल्यास मेंदूची कार्यक्षमता आणि ताकद वाढते.
२) एक सफरचंद आगीत भाजून पाण्याच्या कळशीत सोडावे. हे पाणी गाळून प्यावे.
३) धणे, खसखस समप्रमाणात घेऊन कुटून घ्या व बारीक चूर्ण करा.
तेवढ्याच प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळा.
एक-एक चमचा चूर्ण सकाळी ९ वाजता व जेवणानंतर रात्री ९ वाजता कोमट गोड दूध किंवा पाण्याबरोबर नियमपूर्वक घ्या. यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.