90 च्या दशकातील सिनेफॅन्सना आयेशा झुल्का हे नाव नवीन नाही.माधुरी दीक्षित, जुही चावला, करिश्मा या अभिनेत्रींचा त्यावेळी बोलबाला होता.यादरम्यान अनेक चेहरे सिनेसृष्टीत आले आणि गेले.दरम्यान एका चेहऱ्याने मात्र लक्ष वेधले, तो चेहरा म्हणजे आयेशा झुल्का यांचा.आकर्षक चेहरा आणि स्क्रीनवरील प्रसन्न वावर यामुळे अल्पावधीतच आयेशा यांनी स्थान निर्माण केले.पण करियर अगदी पीकवर असताना आयेशा सिनेमातून जवळपास गायबच झाल्या.याला कारण ठरले ते त्यांचे ब्रेक अप. अभिनेता अरमान कोहलीसोबत त्यांनी लग्न करण्याचे ठरवले होते.पण अरमान यांनी अचानक या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला याचा आयेशा याना धक्का बसला.यानंतर त्यांनी सिनेमे साईन करणे बंद केले आणि लाईमलाइटपासून लांब गेल्या.