Namdev Gharal
पावसाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती मंदावलेली असते अशावेळी पौष्टीक खाणे महत्वाचे ठरते, यावेळी सर्वात चांगला पर्याय म्हणजे सहज उपलब्ध होणारी अंडी
अंडी ही प्रथिने, व इतर पोषक घटकांनी परीपूर्ण असतात आणि नाष्ट्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय ठरतात, पावासाळ्यात मांस मच्छी खाणे सुरक्षित माणले जात नाही त्यामुळे अंडी हा चांगला पर्याय ठरतो
पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोका वाढतो. अंड्यामध्ये असणारे व्हिटॅमिन D, B12, झिंक आणि सेलेनियम शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळत असल्याने शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता भासते. अंड्याचा पिवळा भाग हा व्हिटॅमिन D चा उत्तम स्रोत आहे.
पावसाळ्यात उघड्यावरील किंवा बाहेरचे अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार होतात. उकडलेली अंडी पूर्णपणे शिजलेली असल्याने ती खाण्यासाठी अत्यंत सुरक्षित मानली जातात.
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे अनेकदा आळस आणि थकवा जाणवतो. अंड्यातील उच्च दर्जाचे प्रोटीन शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवते.
पचनास हलके: तळलेले किंवा मसालेदार पदार्थांच्या तुलनेत उकडलेली अंडी पचायला सोपी असतात आणि पोटाला आराम देतात.
पावसाळ्यात भजी किंवा तिखट-तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. रोज उकडलेले अंडे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
स्नायू आणि हाडांचे आरोग्य: अंड्यामध्ये असणारी अमिनो ॲसिड्स आणि कॅल्शियम स्नायूंना बळकट करतात आणि हाडांचे आरोग्य उत्तम ठेवतात