Namdev Gharal
सध्या पावसाळा आहे यावेळी कणीस, भुट्टा खाण्याची मजाच काही और असते, पण बऱ्याचवेळा उकडलेले कणीस खावे की भाजलेले कणीस यामध्ये गोंधळ उडतो
कणीस खाण्याचे फायदे अनेक आहेत त्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारे उकडून किंवा भाजून आहारात समावेश होणे गरजेजेचे आहे. दोन्हीचे काय फायदे आहेत पाहूया
भाजलेले कणीस : कणीस भाजल्यामुळे त्यातील फेरुलीक ॲसिड (Ferulic acid) सारख्या अँटी-ऑक्सिडंट्सची पातळी वाढते, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात.
कफ कमी करण्यासाठी: भाजलेले कणीस उष्ण प्रकृतीचे असते. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास असताना लिंबू आणि मसाला लावून भाजलेले कणीस खाल्ल्यास गळ्याला आराम मिळतो आणि कफ कमी होतो.
उकडलेले कणीस – उकडलेले कणीस आरोग्यासाठी आणि पोषणासाठी सर्वोत्तम मानले जाते. पाण्यात थोडे मीठ टाकून उकडलेले कणीस खाणे आरोग्य तज्ज्ञ जास्त योग्य मानतात.
कणीस उकडल्यामुळे त्यातील मऊ दाण्यांमधील व्हिटॅमिन बी, सी, फॉलिक ॲसिड आणि फायबर जसेच्या तसे टिकून राहतात. भाजताना काही वेळा दाणे जळतात, ज्यामुळे त्यातील पोषण कमी होऊ शकते, उकडताना असे होत नाही.
उकडलेले दाणे खूप मऊ असतात, त्यामुळे ते पचायला अत्यंत हलके असतात. लहान मुले, वृद्ध किंवा ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी उकडलेले कणीस उत्तम पर्याय आहे.
दात आणि हिरड्यांसाठी सुरक्षित: भाजलेले कणीस काही वेळा कडक होते, ज्यामुळे दातांवर ताण येतो. उकडलेले कणीस मऊ असल्याने खाण्यास सोपे जाते.
जर तुमचे वजन कमी करायचे असेल किंवा पोषण हवे असेल: तर उकडलेले कणीस उत्तम आहे. फक्त त्यावर जास्त बटर किंवा चीज टाकू नका.
जर तुम्हाला पावसाळी हवेत खमंग चव हवी असेल आणि सर्दी-खोकल्यापासून आराम हवा असेल: भाजलेले कणीस योग्य आहे, ज्यावर लिंबू, काळे मीठ आणि चाट मसाला लावून तुम्ही आस्वाद घेऊ शकता.