Body scrubbing : दररोज अंग घासून अंघोळ करणे योग्य की अयोग्य?

पुढारी वृत्तसेवा

काही जणांना अंघोळ करताना अंग घासण्याची सवय असते, स्क्रबर किंवा लुफाने अंग घासणे हा शिरस्ता असतो पण हे त्‍वचेच्या आरोग्यासाठी योग्य आहे का हे पाहून घेऊ

स्वच्छतेसाठी दररोज अंग घासणे खरंच फायदेशीर आहे की यामुळे त्वचेचे नुकसान होते? त्वचातज्ज्ञांचा सल्ला ऐकल्यावर आश्चर्य वाटेल

दररोज कडक स्क्रब, लूफा किंवा दगडाने अंग घासणे पूर्णपणे अयोग्य आहे. यामुळे त्वचा स्वच्छ वाटत असली तरी तिचे आतून नुकसान होते.

काय होते नुकसान : त्वचेवर 'नॅचरल ऑइल' आणि ओलावा टिकवून ठेवणारा नैसर्गिक थर (Skin Barrier) असतो. दररोज घासल्यामुळे हा थर निघून जाऊन त्वचा प्रचंड कोरडी पडते.

बॅक्टेरिया आणि रॅशेस : जास्त घासल्यामुळे त्वचेवर सूक्ष्म ओरखडे पडतात. तसेच ओल्या लूफामध्ये (Loofah) बॅक्टेरिया आणि फंगस लवकर वाढतात, ज्यामुळे इन्फेक्शन आणि रॅशेस होऊ शकतात.

आठवड्यातून १-२ वेळाच योग्य : मर्यादीत प्रमाणात आणि हलक्या हाताने स्क्रब केल्यास त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि रक्ताभिसरण सुधारते.

काय करणे योग्यः अंघोळ झाल्यानंतर त्वचा हलक्या हाताने पुसा आणि ओल्या त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावा, ज्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहील.

त्‍यामुळे दररोज अंग स्क्रबरने घासणे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे त्‍वचा जरी स्वच्छ दिसत असली तरी त्‍वचेच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरते