भारतात होणाऱ्या प्रत्येक तिसऱ्या मृत्यूमागे हृदयविकार कारणीभूत असल्याचे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.
भारतात सुमारे ३१ टक्के मृत्यू हे हृदयाशी संबंधित आजारांमुळे होत असल्याचे अहवालात आहे.
अशावेळी ब्लूबेरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट असते, जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
ब्लूबेरी दिसायला लहान असली, तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर पोषक तत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
दररोज ब्लूबेरी खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका जवळपास 12-15% कमी होतो.
मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या लोकांसाठी ब्लूबेरी खूप उपयुक्त आहे.
एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, नियमितपणे ब्लूबेरी खाल्ल्यास रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइडची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
ब्लूबेरीच्या सेवनाने रक्तवाहिन्यांची Stiffness कमी होते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका टाळता येतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय अधिक चांगले कार्य करते.
ब्लूबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे, ती रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ब्लूबेरी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
पण योग्य प्रमाण (१ कप) खाणे अत्यावश्यक आहे. अर्धा कप ब्लूबेरी खाल्ल्यास तेवढा फायदा होत नाही.