पुढारी वृत्तसेवा
ऑफिसमध्ये 9 ते 10 तास लॅपटॉपसमोर बसून राहणे, त्यानंतर मोबाईलवर सतत रिल्स स्क्रोल करणे ही आपली जीवनशैली बनली आहे.
गॅजेटस्वर वाढलेले हे अतिप्रमाण आपल्याला गंभीर आजारांच्या खाईत लोटत आहे.
सततच्या स्क्रीन वापरामुळे ‘अनिद्रा’ म्हणजेच झोप न येण्याची समस्या आता सामान्य झाली आहे.
यावर उपाय म्हणून नॅशनल हेल्थ मिशनने काही महत्त्वाचे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, शांत आणि गाढ झोप हवी असेल तर झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉप पूर्णपणे बंद ठेवावा.
स्क्रीनमधून बाहेर पडणारा ‘ब्ल्यू लाईट’ (निळा प्रकाश) मेंदूला सक्रिय ठेवतो.
तसेच ‘मेलाटोनिन’ या झोप आणणाऱ्या हार्मोनची निर्मिती रोखतो.
यामुळे झोप उशिरा येते, वारंवार जाग येते आणि सकाळी उठल्यावर थकवा, चिडचिडेपणा व तणाव जाणवतो.