Blue Java Banana : निळी केळी कधी पाहिली आहेत का? चवही असते व्हेनिला आईस्क्रिमसारखी!

Namdev Gharal

जगात अनेक प्रकारची केळी पाहायला मिळतात पण एक अशी वैशिष्टयपूर्ण केळी हवाई बेटे व ऑस्ट्रेलिया येथे भेटते जी आपल्या निळ्या रंगासह विषेश चवीसाठी ओळखली जाती

या केळीचे नाव आहे ब्लू जावा या केळीला तिच्या अप्रतिम चवीमुळे जगभरात 'आइसक्रीम बनाना' (Ice Cream Banana) या टोपणनावाने ओळखले जाते.

ही केळी कच्ची असताना तिची साल सामान्य केळीसारखी हिरवी नसून, अतिशय आकर्षक चंदेरी-निळ्या (Silvery-Blue) रंगाची दिसते.

केळी पूर्णपणे पिकल्यानंतर तिचा निळा रंग कमी होतो आणि ती नेहमीच्या केळीसारखी फिकट पिवळी दिसू लागते.

या केळीचा सर्वात मोठा विशेष म्हणजे हिची चव सौम्य व्हॅनिला फ्लेवरसारखी असते. ती खाताना हुबेहूब आइसक्रीम खाल्ल्याचा फिल येतो.

या केळीच्या आतील गर अत्यंत मऊ, लोण्यासारखा आणि क्रीमी (Creamy) असतो, जो तोंडात टाकताच विरघळतो.

ही केळी प्रामुख्याने आग्नेय आशियात (Southeast Asia) उगम पावली असून, हवाई, मध्य अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये ती मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते.

बर्फाळ हवामानातही तग धरते: सामान्य केळीच्या झाडांना कडक ऊन लागते, पण 'ब्लू जावा' केळीचे झाड उणे ७ अंश सेल्सिअस पर्यंतची थंडी सहज सहन करू शकते.

दिसायला देखणे झाड : या केळीचे झाड सुमारे १५ ते २० फूट उंच वाढते. याची पाने पांढरट-हिरव्या रंगाची आणि अतिशय सुंदर दिसतात.

पोषक तत्वांचा खजिना, चवीसोबतच ही केळी आरोग्यासाठीही उत्तम आहे. यात पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असते.

क्रीमी पोतामुळे या केळीचा वापर शेक, स्मूदी, फ्रूट सॅलड आणि नैसर्गिक 'नॅचरल आईस्क्रीम' बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो

या केळीचा मऊपणा आणि सुवास उत्तम असल्यामुळे व्हॅनिला फ्लेवरचे केक, मफिन्स आणि कस्टर्ड बनवतानाही याचा वापर केला जातो.