Blood Sugar Testing Guide: शुगर तपासण्याची योग्य वेळ कोणती; लोकांनी कोणती चूक टाळावी?

Anirudha Sankpal

टाइप १ मधुमेह असलेल्या रुग्णांनी दिवसातून ४ ते ५ वेळा, तर टाइप २ च्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित शुगर तपासणे गरजेचे आहे.

Diabetes In Children | pudhari

रिकाम्या पोटी शुगर तपासताना किमान ८ तासांचा उपवास (फास्टिंग) असणे आवश्यक आहे, अन्यथा रीडिंग चुकीची येऊ शकते.

जेवणानंतर नेमकी २ तासांनी शुगर तपासणे सर्वात योग्य असते, कारण हीच वेळ अचूक माहिती देते.

एचबीए१सी (HbA1c) टेस्ट दर ३ ते ४ महिन्यांनी केल्यास गेल्या काही महिन्यांतील शुगरची सरासरी पातळी समजते.

या टेस्टसाठी उपवासाची किंवा विशिष्ट वेळेची गरज नसते, ती कधीही करता येते.

जेवणापूर्वी शुगर ८० ते ११० mg/dL आणि जेवणानंतर ती १८० mg/dL पेक्षा कमी असणे सामान्य मानले जाते.

जर शुगरची पातळी यापेक्षा जास्त राहत असेल, तर स्वतःहून उपचार न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

औषधोपचार, योग्य आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीच्या मदतीने मधुमेहावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

येथे क्लिक करा