मुत्राशयाचा कर्करोग हा मुत्राशयाच्या अस्तरातील असामान्य पेशींच्या वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. .हा प्रामुख्याने मुत्राशयाच्या आतल्या बाजूस असलेल्या ट्रान्झिशनल सेल्समध्ये सुरू होतो. .तंबाखू सेवन, प्रदूषण आणि काही औद्योगिक रसायनांच्या संपर्कामुळे या आजाराची शक्यता वाढते..मुत्राशयाच्या कर्करोगाचे प्रकार१) युरोथेलियल कार्सिनोमा (ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा) हा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे, जो मुत्राशयाच्या आतल्या पेशींमध्ये सुरू होतो. .२) स्क्वॅमस सेल कार्सिनोमा ही स्थिती दीर्घकालीन संसर्ग किंवा दीर्घकालीन मुत्राशयातील जळजळ झाल्यास उद्भवू शकते. .३) एडेनोकार्सिनोमा हा प्रकार मुत्राशयातील ग्रंथींमधून उद्भवतो आणि तुलनेने दुर्मीळ आहे..मुत्राशयाच्या कर्करोगाची लक्षणे:लघवीत रक्त येणे (हेमॅट्युरिया)वारंवार लघवीला जाण्याची गरज जाणवणे.लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणेपाठदुखी किंवा पोटदुखीवजन झपाट्याने कमी होणे आणि थकवा जाणवणे