Black Tiger: भारतात आढळतो जगाच्या पाठीवर कुठंही न सापडणार संपूर्ण 'काळा' वाघ

Anirudha Sankpal

जगातील दुर्मिळ 'काळे वाघ' केवळ भारताच्या ओडिशा राज्यातील सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पात आढळतात.

हे वाघ पूर्णपणे काळे नसून त्यांच्या अंगावरील काळे पट्टे अत्यंत जाड आणि एकमेकांना जोडलेले असतात.

या वैशिष्ट्याला विज्ञानात 'स्यूडो-मेलानिझम' (Pseudo-melanism) असे म्हटले जाते.

वाघांच्या शरीरातील Taqpep नावाच्या एका विशिष्ट जनुकामध्ये (Gene) बदल झाल्यामुळे हा रंग प्राप्त होतो.

एकाच भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या वाघांमध्ये होणाऱ्या प्रजननामुळे (Inbreeding) हा जनुकीय बदल पिढ्यानपिढ्या टिकून आहे.

१९९३ मध्ये पहिल्यांदा या वाघाचे दर्शन झाले असून, सध्या त्यांची संख्या केवळ ७ ते ८ च्या दरम्यान आहे.

हे वाघ इतर सामान्य वाघांच्या तुलनेत आकाराने थोडे लहान आणि रंगाने गडद दिसतात.

जंगलातील घनदाट सावलीत लपण्यासाठी या काळपट रंगाचा त्यांना नैसर्गिक फायदा मिळतो.

जगाच्या पाठीवर इतर कुठेही न आढळणारा हा वाघ भारताचा एक अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक ठेवा आहे.

येथे क्लिक करा