अंजली राऊत
ग्लोईंग स्कीनसाठी द्राक्षाच्या अर्काचा वापर करा
द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी सोबत अँटीऑक्सिडंट्स, विशेषतः रेझवेराट्रोल आणि फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
द्राक्षे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, त्यामुळे फ्री रॅडिकल्स, हवेतील प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या कोमल त्वचेचे संरक्षण करते.
लाल आणि काळ्या द्राक्षांच्या सालीमध्ये असणारे रेझवेराट्रोल हे संयुग निसर्गातील सर्वात शक्तिशाली अँटी-एजिंग रेणूंपैकी एक आहे.
रेझवेराट्रोलमुळे जळजळ कमी होण्यास मदत होते, कोलेजन वाढवून सूर्यप्रकाशापासून तुमच्या नाजूक त्वचेचे रक्षण करते.
व्हिटॅमिन सी त्वचेला उजळवण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते.
द्राक्षाच्या बियांचा अर्क, सनस्क्रीनसोबत वापरल्यास, स्किन टोन चांगला ठेवण्यासाठी मदत करू शकतो.