पुढारी वृत्तसेवा
सध्याच्या धावपळीच्या जगात 'लो-कॅलरी' (कमी उष्मांक) पेय म्हणून 'ब्लॅक कॉफी'ला मोठी पसंती मिळत आहे.
सकाळी उठल्यानंतर दिवसाची उत्साही सुरुवात करण्यासाठी ब्लॅक कॉफी एक उत्तम पर्याय मानली जाते.
शरीराला ऊर्जा देण्यासोबतच हे पेय आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते; मात्र याचे अतिसेवन शरीरासाठी घातकही ठरू शकते.
ब्लॅक कॉफीमध्ये असे अनेक घटक असतात जे तुमची एकाग्रता वाढवण्यास मदत करतात.याचे सेवन केल्याने मेंदू तरतरीत होतो, दैनंदिन कामे करण्यात उत्साह येतो.
संशोधनानुसार, ब्लॅक कॉफीचे मर्यादित सेवन केल्यास 'टाइप २ मधुमेह' आणि यकृताच्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
ब्लॅक कॉफीमधील काही घटक पचनसंस्थेतील उपयुक्त सूक्ष्मजीवांना (Gut Microbes) निरोगी ठेवण्यास मदत करतात, जे पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.
ब्लॅक कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅसिडीटीची पातळी वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ होणे किंवा 'अॅसिड रिफ्लक्स'सारख्या समस्या उद्भवू शकतात.
कॉफीमधील कॅफिनच्या अतिप्रमाणामुळे झोप न येणे (Insomnia) आणि चिंता वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात. यामुळे अस्वस्थ वाटू शकते.
ब्लॅक कॉफी गुणकारी असली तरी ती प्रमाणात पिणे आवश्यक आहे.