पुढारी वृत्तसेवा
ब्लॅक कॉफी आणि लिंबू
आजकल ब्लॅक कॉफीमध्ये लिंबाचा रस मिसळून पिण्याचा ट्रेंड खूप चर्चेत आहे.
वाढती लोकप्रियता
सध्या कॉफी पिण्याच्या पद्धतींमध्ये अनेक बदल झाले असून ब्लॅक कॉफी विशेष लोकप्रिय ठरत आहे.
ऊर्जा आणि वजन नियंत्रण
शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ब्लॅक कॉफीचे सेवन केले जाते.
तज्ज्ञांचे मत
परंतु, केवळ या एका पेयामुळे शरीरात लक्षणीय बदल होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
Black coffee & lemon benefitsकॅफिनचे फायदे
ब्लॅक कॉफीमधील कॅफिनमुळे शरीराला ऊर्जा आणि ताजेतवानेपणा जाणवू शकतो.
व्हिटॅमिन सीचा स्त्रोत
लिंबू हे व्हिटॅमिन 'सी'चे एक उत्तम आणि चांगले स्त्रोत मानले जाते.
फॅट कमी होण्याबाबत संभ्रम
कॉफीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने व्हिटॅमिन 'सी' मुळे फॅट कमी होते, याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
त्यामुळे हे कॉम्बिनेशन वजन कमी करण्यासाठी खरोखरच फायदेशीर ठरेलच, याबाबत शाश्वती देता येत नाही.