करिअरच्या सुरुवातीला हुमा कुरेशीला आपल्या साईजमुळे रिजेक्शन झेलावं लागलं होतं.कास्टिंग एजेंट्सचे मेसेज आल्यानंतर वेस्टर्न ड्रेस, इंडियन ड्रेस गेटअपमध्ये तिला जावं लागायचं.ऑडिशनमध्ये तिला पाहून डायरेक्टर म्हणायचे, 'नॉट फिट'.तेव्हा तिला समजलं की, तिला तिच्या वजनामुळे रिजेक्शन मिळताहेत .अनेकदा नेटिझन्सकडून तिला बॉडिंग शेमिंगवरून ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.ट्रोलर्स म्हणायचे की -'ती प्रेग्नेंट आहे,' 'पोट किती बाहेर आहे,' 'ड्रेस किती विचित्र दिसत आहे' .पण, गँग्स ऑफ वासेपुरसारखा हिट चित्रपट देणारी हुमाच होती .पुढे तिने स्वत: ला फिट ठेवण्यासाठी योगा, स्ट्रेंथ -वेट ट्रेनिंग, कार्डियो करण्यास सुरुवात केली .आता ती २८ दिवसांचा डिटॉक्स डाएट फॉलो करते, दिवसभरात १२ ग्लास पाणी पिते .मिड-मॉर्निंग स्नॅक्समध्ये डाळींब खाते, चीट डे दिवशी हेल्दी चीट मील खाते.'Border-2' मध्ये दिसणार ही अभिनेत्री; आहे तरी कोण? जाणून घ्या