आसामच्या 'या' रहस्यमय गावात पक्षी 'सामूहिक जीवन संपवतात?

पुढारी वृत्तसेवा

आसाम हे इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा सुंदर संगम असलेले एक अद्भुत ठिकाण आहे.

जतिंगा नावाच्या एका छोट्या गावात घडणारी अनोखी आणि गूढ घटना.

या गावात पक्षी जीवन संपवतात असे म्हटले जाते.

आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्याच्या सुंदर टेकड्यांमध्ये जतिंगा हे गाव वसलेले आहे.

दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांदरम्यान, संध्याकाळी 7 ते रात्री 10 वेळेत येथे एक विचित्र घटना घडते.

अनेक स्थलांतरित पक्षी अचानक खाली कोसळतात आणि त्यांचा मृत्यू होतो.

हे रहस्यमय ‌‘पक्ष्यांचे मृत्यू‌’ अनेक दशकांपासून स्थानिक लोक आणि वैज्ञानिकांना कोड्यात पाडत आहेत.

याच दरम्यान, टायगर बिटरन, किंगफिशर, लिटल एग्रेाट, ब्लॅक ड्रोन, ग््राीन पिजन, हिल पार्ट्रिज, एमराल्ड डव, नेकलेस्ड लाफिंग थश हे पक्षी अचानक गावाकडे येतात.

मान्सूनच्या काळात तीव वारे, धुके यामुळे पक्षी भरकटतात. गावातील प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि घरांना धडकून मरतात.

शास्त्रज्ञांच्या मते जतिंगा परिसरातील जमिनीखालील पाण्यामुळे तयार होणाऱ्या विशिष्ट चुंबकीय प्रभावामुळे पक्ष्यांची दिशा ओळख क्षमता बिघडते.