Biggest Ship Ever : टायटानिक पेक्षा दुप्पट आकाराचे, मानवी इतिहासातील सर्वात मोठे जहाज! नांगरच होता ३६ टनांचा

Namdev Gharal

जगात 'सीवाईज जायंट' (Seawise Giant) हे मानवी इतिहासातील आजवरचे सर्वात लांब आणि सर्वाधिक वजन क्षमता असलेले महाकाय जहाज मानले जाते. त्याचा नांगरच होता ३६ टनांचा

आज जरी सध्या हे जहाज अस्तित्वात नसले, तरी लांबी आणि एकूण क्षमतेचा याचा विक्रम अजूनही अबाधित आहे.कारण २००९ साली याचा अखेरचा प्रवास झाला.

या जहाजाची लांबी तब्बल ४५८.४५ मीटर (१,५०४ फूट) होती. हे जहाज प्रसिद्ध 'टायटॅनिक'पेक्षा दुप्पट लांब आणि अमेरिकेच्या 'एम्पायर स्टेट बिल्डिंग'च्या उंचीपेक्षाही मोठे होते.

याचे एकूण वजन सुमारे ५,६४,७६३ टन होते. हे जहाज एकाच वेळी सुमारे ४१ लाख बॅरल्सपेक्षा जास्त कच्चे तेल वाहून नेऊ शकत होते.

पूर्ण भरलेले असताना या जहाजाचा तळ समुद्रात २४.६ मीटर खोल जात असे. यामुळे ते पनामा कालवा, सुएझ कालवा किंवा इंग्लिश चॅनेलसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांमधून जाऊच शकत नव्हते.

पूर्ण वेगाने धावताना या जहाजाचे इंजिन बंद केले, तरी ते पूर्णपणे थांबण्यासाठी सुमारे ९ किलोमीटर अंतर लागायचे, तसेच त्याला वळण्यासाठी ३ किलोमीटरपेक्षा जास्त परिसर लागायचा.

१९८८ च्या इराण-इराक युद्धादरम्यान इराकी लढाऊ विमानांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हे जहाज पेटून पर्शियन आखातात बुडाले होते.

युद्ध संपल्यानंतर नॉर्वेच्या एका कंपनीने हे बुडालेले महाकाय जहाज समुद्रातून बाहेर काढले, त्याची डागडुजी केली आणि 'हॅपी जायंट' नावाने ते पुन्हा सेवेत आणले.

२००४ मध्ये वाहतुकीतून निवृत्त झाल्यानंतर या जहाजाचे रूपांतर कतारच्या किनाऱ्यावर समुद्रातील तरंगती तेल साठवणूक यंत्रणा म्हणून करण्यात आले होते.

सुमारे तीन दशकांच्या ऐतिहासिक सेवेनंतर २००९-२०१० मध्ये गुजरातमधील 'अलंग' शिप ब्रेकिंग यार्डमध्ये या महाकाय जहाज तोडण्यात आले.